June 19, 2026 11:27 pm

V1News Telangana

भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या अध्यक्ष व प्रशासकांची सीमावर्ती भागाच्या शिष्टमंडळाकडून भेट घेणार ;तेलंगणा व सीमा भागात शाखा विस्ताराची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड विशेष प्रतिनिधी – वैभव घाटे 

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा दूरदृष्टीपूर्ण विचार करून तब्बल 43 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भाग्यलक्ष्मी महिला बँकेने नुकताच 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सहकार आणि बँकिंग क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या बँकेच्या कार्याचा विस्तार तेलंगणा तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील गावांपर्यंत व्हावा, या मागणीसाठी सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव मुंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच बँकेच्या अध्यक्ष आणि प्रशासकांची भेट घेणार आहे.

सन 1983 मध्ये विविध क्षेत्रांतील सुसंस्कृत, दूरदर्शी आणि समाजाभिमुख महिलांनी एकत्र येऊन भाग्यलक्ष्मी महिला बँकेची स्थापना केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही संस्था आज हजारो ठेवीदार, बचतदार, महिला उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे.

सध्या बँकेच्या मराठवाड्यात 21 शाखा कार्यरत असून जळगाव येथे एक शाखा आहे. नवा मोंढा येथील भव्य मुख्य कार्यालयासह एकूण 23 शाखांच्या माध्यमातून बँक विविध बँकिंग सेवा पुरवत आहे. नांदेड शहरातील नवा मोंढा, महावीर चौक, शिवाजीनगर, सराफा, पूर्णा रोड आणि छत्रपती चौक येथील शाखा नागरिकांना आधुनिक आणि विश्वासार्ह सेवा देत आहेत.

नवा मोंढा येथील बँकेची भव्य मुख्य इमारत ही नांदेड शहराच्या वैभवात भर घालणारी असून महिला नेतृत्व, आर्थिक शिस्त आणि स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. स्थापनेपासून बँकेने पारदर्शक कारभार, ग्राहकाभिमुख सेवा आणि महिला सक्षमीकरणाची मूल्ये जपली आहेत.

सीमावर्ती भागातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, महिला बचत गट आणि लघुउद्योजक यांना विश्वासार्ह बँकिंग सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तेलंगणा सीमेलगतच्या गावांमध्ये तसेच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्याची मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या संचालक मंडळात महिलांचे वर्चस्व असून सुमारे 70 टक्के महिला आणि 30 टक्के पुरुष संचालकांचा सहभाग आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे वाटचाल करणारी ही बँक सहकार क्षेत्रात आदर्श मानली जाते.

बँकेच्या 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या यशाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा पराडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशपांडे यांनी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियामक चौकटीत कार्यरत असलेल्या भाग्यलक्ष्मी महिला बँकेने 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून हा बँकेच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण आहे.

या ऐतिहासिक यशाबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बँकेच्या अध्यक्षा यांच्या उपस्थितीत सविस्तर माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सीमा अतनूरकर यांच्याकडे असून शिस्तप्रियता, वक्तशीरपणा आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांनीभाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या अध्यक्ष व प्रशासकांची सीमावर्ती भागाच्या शिष्टमंडळाकडून भेट घेणार ;

तेलंगणा व सीमा भागात शाखा विस्ताराची मागणी

सध्या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सीमा अतनूरकर यांच्याकडे असून शिस्तप्रियता, वक्तशीरपणा आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने प्रगतीची नवी उंची गाठल्याची भावना ग्राहक आणि सभासदांमधून व्यक्त होत आहे.

महिलांच्या कर्तृत्व, दूरदृष्टी आणि सक्षम आर्थिक व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून भाग्यलक्ष्मी महिला बँकेकडे पाहिले जाते. 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा हा केवळ बँकेचा आर्थिक यशाचा मैलाचा दगड नसून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीचा गौरवशाली विजय असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. सीमावर्ती भागात शाखा विस्ताराच्या प्रस्तावामुळे बँकेच्या विकासाला आणखी नवे आयाम प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने प्रगतीची नवी उंची गाठल्याची भावना ग्राहक आणि सभासदांमधून व्यक्त होत आहे.

महिलांच्या कर्तृत्व, दूरदृष्टी आणि सक्षम आर्थिक व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना म्हणून भाग्यलक्ष्मी महिला बँकेकडे पाहिले जाते. 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा हा केवळ बँकेचा आर्थिक यशाचा मैलाचा दगड नसून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीचा गौरवशाली विजय असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. सीमावर्ती भागात शाखा विस्ताराच्या प्रस्तावामुळे बँकेच्या विकासाला आणखी महत्व प्राप्त होत आहे 

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more