May 15, 2026 8:21 pm

V1News Telangana

बिलोली शहरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साह साजरा रक्तदाते पोलीस अधिका-यांवर कौतुकाचा वर्षाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड प्रतिनिधी- वैभव घाटे
 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बिलोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला तसेच या वेळी शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात  30 दानशूर रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 दर वर्षी प्रमाणे यंदाही शहरातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून जेष्ठ नागरी वैजनाथ मेघमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी उपनगराध्यक्ष अनुप अंकोशकर उपविभागिय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर नायब तहसिलदार बालाजी मिठ्ठेवाड ना. त. परळीकर, स. पो. नि. कमल शिंदे अँडो. भरत  पवार, नागनाथ तुमोड,दिलीप पांढरे., पांडुरंग रामपुरे,व्यंकटराव पा.खतगावकर,इंद्रजित तुडमे,सुनिल यंबडवार स. पो. नि. शिवराज लोखंडे,राजु पाटील शिंपाळकर, प्रा. शंकर पवार,अभिजित तुडमे,विजय कुंचनवार,बाबाराव पा. रोकडे,संदिप कटारे, अजमत चाऊस, गंगाधर पपुलवार,राजु गादगे,गंगाधर पा. नरवाडे, श्रीनिवास शिंदे,आशोक दगडे,भाऊसाहेब बनबरे,सय्यद रियाज, मारोती मालुसरे, साईनाथ रुद्रुरकर यांच्यासह राजकीय,सामाजिक आशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व फरांदे होंडा शोरुम बिलोलीच्या वतिने आयोजित रक्तदान शिबीरात उपविभागीय पोलिस अधिकारी शाम पानेगावकर, स.पोलीस निरीक्षक कमल शिंदे , सपोनि शिवराज लोखंडे स.पो.नि. सुरज तिडके नगरसेवक शिवाजी गायकवाड, साईनाथ खंडेराय,तुकाराम शिंदे, श्री निवास मालुसरे, श्री कृष्ण लघुळे यांच्यासह ३० दानशुरानी  रक्तदान केले आसुन   पोलिस अधिका-यानी रकतदान करुन आपल्या खाकी वर्दिचा समाजापुढे एक आदर्श या वेळी दाखवुन दिल्या बदल सार्वजनिक शिवजनमोत्सव समिती बिलोली व फरांदे होंडा कंपनीच्या वतीने राजु पाटील शिंपाळकर व प्रल्हाद सुर्यवंशी यानी सर्वांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. तर रक्तदाते पोलीस अधिका-यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more