May 15, 2026 11:53 pm

V1News Telangana

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

नांदेड, प्रतिनिधी -वैभव घाटे

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षामार्फत परीक्षाकाळात जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येणार असून, परीक्षेच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी, शिस्तभंग, गैरप्रकार तसेच आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे कामही या कक्षामार्फत केले जाणार आहे.परीक्षा कालावधीत नियंत्रण कक्ष सतत कार्यरत राहणार असून, परीक्षेच्या पारदर्शकतेसह विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more