May 16, 2026 6:00 am

V1News Telangana

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने घुंगराळा येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड प्रतिनिधी- वैभव घाटे

भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी करुनेचा महासागर प्रज्ञासूर्याची सावली, बहुजनांची माऊली, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, यांची १२८ वी जयंती उरुवेला बुद्ध विहार घुंगराळा येथे साजरी करण्यात आली…

यावेळी, साहेबराव पाटील सुगावे व सुमित बोंडले , यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,

सुमित बोंडले, यांनी देखिल मनोगत व्यक्त करत म्हणाले की. माता रमाईचा प्रसंग सांगताना म्हणाले की माता रमाई आंबेडकर, यांची तब्येत खालावली असताना हया पालट म्हणून धारवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे सर , यांच्या घरी हवा पालट म्हणून राहण्यासाठी गेल्या माता रमाईने तेथील वराळे सर यांच्या निवासी वसतिगृहा मध्ये शासकीय अनुदान राशन हे वेळेवर न भेटल्याने दोन दिवसापासून येथील विद्यार्थी उपाशी होते. हे माता रमाईला समजल्याने त्यांनी आपल्या डब्यात ठेवलेले दागिने विकून विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची जेवणाची वस्ती व्यवस्था केली. म्हणून माता रमाईंना करुनीचा महासागर म्हटले जाते ,

रमाईच्या त्यागशिवाय आणि कष्टाशिवाय बाबासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाले नसते. रमाई जयंती ही त्यागाची जयंती आपण साजरी करतो. त्या त्यागाचा गुण सर्वांनी स्वीकारला पाहिजे असे मनोगत वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे घुंगराळेकर , यांनी मांडले..

युवा व्याख्याता रोहित आढाव यांनी रमाबाई आंबेडकर बद्दल मनोगत व्यक्त करत म्हणाले की माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन परिचय दिला. माता रमाबाई आंबेडकर हे त्याग मूर्ती म्हणून ओळखले जातात त्यांनी केलेला त्याग है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये मोलाचा ठरलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाबाई कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सहकार्य करत होते त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर घडले आहेत असे उद्वार त्यांनी काढले माता रमाबाई आंबेडकर यांनी आपला त्याग करून सहनशील ते प्रमाणे परिवाराचा गाडा हाकला व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रदेशात जरी राहिले त्यांना मदत करत होते. त्यामुळे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उमा असते व त्या स्त्री मुळेच एखादा माणूस घडू शकतो असे उदाहरण म्हणजे माता रमाबाई आंबेडकर यांचा त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर घडले असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.

.

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more