May 16, 2026 1:00 am

V1News Telangana

सरपंच पदाच्या हव्यासापोटी पोटच्या लेकीचा गळा घोटून प्रेत कॅनॉलमध्ये फेकले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड प्रतिनिधी- वैभव घाटे

दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य असल्याने आपणास सरपंच पदाची निवडणूक लढविता येणार नाही, सरपंच पदाच्या हव्यासापोटी एका निर्दयी बापाने पोटच्या लेकीचा गळा घोटून व तिचे प्रेत कॅनॉलमध्ये फेकून खून. केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्यास बेड्या ठोकल्या आहेत. मुखेड तालुक्यातील केरूर येथे ही संतापजनक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केरूर येथील पांडुरंग कोडामंगले याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद ओबीसीला असल्याने सरपंच पदाचा त्यास हव्यासझाला. या निवडणुकीत आपले तिसरे अपत्य अडसर ठरू नये म्हणून पोटच्या चिमुकल्या मुलीचा गळा दाबून तेलंगणातील कॅनॉलमध्ये फेकल्याचा दुर्दैवी व संतापजनक प्रकार घडला आहे.
प्रारंभी आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची बतावणी आरोपीने केली होती. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपी पित्याने आपणच आपल्या मुलीचा गळा घोटला असल्याचा पोलिसांना या हत्येमागे निवडणुकीचे कारण
असल्याचे कबुली जबाब दिला आहे. , या कटात आरोपीची पत्नी व केरूरचे सरपंच प्रतिनिधी हे सुध्दा सहभागी असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
आरोपी पांडुरंग बाबूराव कोंडामंगले (३२) रा. केरूर हा मुखेड शहरातील बा-हाळी चौकात कुटुंबासह वास्तव्यास होता. २९ जानेवारी रोजी त्याने मुलगी प्राची कोंडामंगले (७) हीस दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीवर बसविले व त्याच्या पत्नीस नांदेडला जातो, असे सांगुन तो तेलंगणा राज्यातील येडपल्ली भागात गेला. रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये त्याने कु. प्राचीचा गळा दाबून तिला कॅनॉलमध्ये फेकले होते. सदर घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी तेलंगणा पोलिसांना दिली. तेलंगणा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवित मुखेड पोलिसांच्या मदतीने आरोपी पांडूरंग कोडामंगले यास अटक केली. पोलिसांच्या अधिक तपासात केरूर गावचे सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. आगामी निवडणुकीत पांडुरंग कोंडामगले यास सरपंचपदाचा हव्यास झाला. मात्र त्याला यापूर्वीच्या दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्ये असल्याने पूर्वीच्या जुळ्या दोन मुलीपैकी एका मुलीचा काटा काढून हयात अपत्यांची संख्या दोन दाखवून सरपंच होता येईल, या मानसिकतेतून त्याने आपल्या पोटच्या मुलीचा काटा काढण्याचा कट रचला. मात्र तेलंगणा पोलिसांच्या कसून केलेल्या चौकशीमुळे हा प्रकार आरोपीच्या अंगलट आला आहे.

चौकट..
गावचे सरपंचपद होते ओबीसीसाठी राखीव
पांडुरंग कोडामंगले हा मुखेड शहरातील बाऱ्हाळी नाका येथे सलून सेंटर चालवत होता. गावातील अनेक जण त्याच्याकडे दाढी, कटींग करण्यासाठी यायचे व आलेला प्रत्येक जण काय चाललय सरपंच म्हणून पांडुरंग यास बोलायचे, यातच राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या पांडुरंग कोंडामंगले यास २ बाळगून असलेल्या पाडुरंग जुळ्या मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य होते. तीन अपत्य असल्यास आपणास निवडणूक लढता येणार नाही, त्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे समजते. केरूरचे सरपंच प्रतिनिधी गणेश चंद्रकांत शिंदे यांनाही तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कटाची कल्पना आरोपीच्या पत्नीला असल्याचेही तपासात समोर आले आहे.

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1 News & Daily Newspaper is Hiring Reporters V1 News & Daily Newspaper invites applications from enthusiastic and dedicated individuals to join our team as Reporters. Interested candidates can contact: PENDKAR SRINIVAS 📞 9603925163 📞 9834485832

Leave a Comment

Read more
Read more