नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजित दादा यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने आपला एक लाडका नेता, विकासाचा ध्यास घेतलेला कामाचा माणूस गमावला आहे. त्यांच्या निधनाने जनतेच्या मनात निर्माण झालेली पोकळी शब्दांत व्यक्त करणे कठीण झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देता यावा, या जिव्हाळ्याच्या भावनेतून नांदेड शहर, नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा मार्गे श्री काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे नेण्यात येणाऱ्या अस्थिकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान बिलोली तालुक्यातील शंकरनगर (रामतीर्थ) येथे अस्थिकलशाचे दर्शन व पूजन करण्यात आले.
यावेळी परिसरात शोकाकुल वातावरण होते. डोळ्यांत अश्रू आणि मनात दादांच्या आठवणी घेऊन नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत श्रद्धेने नतमस्तक होत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम केला. “अजित दादा अमर रहें” अशा घोषणा देत उपस्थितांची भावना व्यक्त होत होती.
या अस्थिकलश यात्रेत माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा मिनलताई पाटील खतगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, आनंदराव बिराजदार, बिलोली शहराध्यक्ष मिलिंद मांजरमकर, कार्यकर्ते राजकुमार गादगे, शहर उपाध्यक्ष इरफान शेख, नरेश तोटलवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.
V1 News & Daily Newspaper is Hiring Reporters V1 News & Daily Newspaper invites applications from enthusiastic and dedicated individuals to join our team as Reporters. Interested candidates can contact: PENDKAR SRINIVAS 📞 9603925163 📞 9834485832








