May 15, 2026 9:37 pm

V1News Telangana

गंजगाव मध्ये इफ्तार पार्टी ’मुळे हिंदू-मुस्लिम समाजा मध्ये एकोपा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्या बरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल, अशी भावना हिंदु मुस्लिम बाधवामध्ये आहे शुक्रवार  सायंकाळी आयोजित इफ्तार पार्टीत आयोजन केले होते बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मांतील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल. यावेळी माजी सरपंच प्रतिनिधी हणमंत कनशेटे मा. सरपंच प्रतिनिधी माधवराव घाटे भुजंगराव जाधव मारोती साखरे दत्तात्र्य गायकवाड राजु गायकवाड आरिफ पठाण मोहसीन पठाण मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more