May 15, 2026 11:54 pm

V1News Telangana

महसूल पथकाची धडाकेबाज कारवाई. बिलोली तालुक्यातील वाळू माफियांना दणका नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांच्या पथकाने हायवा केला जप्त.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

तालुक्यातील सगरोळी येथील शासकीय रेती घाटावरून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर महसूल विभागाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांच्या पथकाने धाडसी कारवाई करत वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा पकडला असून,अवैद्यरित्या वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.सदर वाहन पुढील कारवाईसाठी तहसिल कार्यालयात लावण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या आदेशावरून व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने सगरोळी परिसरात सापळा रचला होता. यावेळी शासकीय घाटावरून अवैध वाळू घेऊन जाणारा हायवा (क्र. MH 20 GC 0793) पथकाने शिताफीने पकडला. सदर वाहन रेतीची वाहतुक करतांना महसुल पथकाने चौकशी केली असता सदर हायवा गाडीला रेतीची इन्व्हाइस व कसलीही पावती आढळून आली नसल्याकारणाने ही कारवाई झाली ही कारवाई नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, तलाठी धनंजय माळेगावकर, चक्रधर जाधव आणि अमित गायकवाड यांच्या पथकाने केली.
—————चौकट———
पकडण्यात आलेली वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.अवैद्यरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या कारवाईमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या टोळ्यांना चाप बसला असून, नागरिकांमधून महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे.
“अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, यापुढेही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील.

बालाजी मिठेवाड,
नायब तहसीलदार, बिलोली.

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more