May 16, 2026 12:47 am

V1News Telangana

बोळेगावचा निलंबीत ग्रामरोजगार साह्यक पुन्हा कामावर. ग्रामसेवकाकडून ग्रामरोजगार सह्याकाची पाठराखण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

बिलोली तालुक्यातील मौ. बोळेगाव येथे रोहयो योजनेच्या कामात गैरव्यवहार करून शासनाची निधी हडप केल्या प्रकरणी ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने येथील ग्रामरोजगार साह्यक विठ्ठल एकंबे यास दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पदावरून निलंबीत करण्यासाठी एकामताने ठराव पारित करण्यात आला. परंतु संबंधित ग्रामसेवकाच्या वर्दहस्तामुळे तो रोजगार साह्यक पुन्हा कामावर रुजूला झाला आहे,म्हणून रोह्योच्या कामात पुन्हा अडचण निर्माण करणार असल्याने गावाकऱ्याकडून संताप व्यक्त केल्या जाते.
बिलोली रोहयो विभागातील साह्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोंडारे यांच्या आशीर्वादाने मौ बोळेगाव येथील ग्रामरोजगार साह्यकाचा मनमानी कारभार चालू आहे. रोहयो योजने अंतर्गत झालेल्या सार्वजनिक वृक्ष लागवड, घरकुलसह शेतकऱ्यांच्या वैयक्तिक योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून शासनाचे लाखो रुपये हडप केले आहे. याबाबत बोळेगावचे जागरूक नागरिक व संबंधित लाभार्थ्यांनी बोळेगाव ग्रामपंचायत कार्यालय व उपमुख्यकार्यकारी अधिकारी अमित राठोड नांदेड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.त्यानुसार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत स्थरावर झालेल्या ग्रामसभेत ग्रामरोजगार साह्यक विठ्ठल एकंबे यास कामावरून निलंबीत कारण्याचा एकमताने ठराव पारित करून त्यास वरील तारखेपासून रोजगार साह्यक पदावरून निलंबीत करण्यात आले होते. परंतु संबंधित ग्रामसेवक व रोहयो विभागाचे एपीओ यांचे आर्थिक हीत संबंध असल्यामुळे त्यास पाठीशी घातल्या जात आहे. म्हणून तो रोजगार साह्यक पुन्हा कामावर रुजू झाला आहे. यामुळे पुन्हा रोहयोच्या कामात अडथळा निर्माण करणार असल्याने ग्रामस्थाकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
————-चौकट ——-
निलंबीत करण्याचा अधिकार फक्त ग्रामपंचायतींनाचं…?

बोळेगाव येथील ग्रामरोजगार साह्यक विठ्ठल एकंबे हा बोळेगाव ग्रा.पं अंतर्गत झालेल्या रोहयो योजनेत सार्वजनिक वृक्ष लागवाडीसह शेतकऱ्यांच्या वैयक्तिक योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून शासनाचे लाखो रुपये हडप केल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या असल्यातरी. याबद्दल त्यास कामारून कमी करणे किंवा निलंबीत करण्याचा अधिकार पंचायत समितीला नसून हे अधिकार संबंधित ग्रामपंचायतीला आहे.

श्रीनिवास पद्धमावर
गट विकास अधिकारी पं.स. बिलोली

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more