May 16, 2026 12:47 am

V1News Telangana

कार्ला (बु.) येथे 15व्या वित्त आयोग निधीत लाखोंचा भ्रष्टाचार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

👉विकासकामे कागदावरच; कार्ला (बु.) येथे 15व्या वित्त आयोग निधीचा गैरवापर
👉न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही — अंकुश हाणमंत जेठे
👉ग्रामविकास अधिकारी व सरपंचांच्या संगनमताचा आरोप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा.

✍️ नांदेड प्रतिनिधी : वैभव घाटे

बिलोली तालुक्यातील मौजे कार्ला (बु.) येथे 15व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या खर्चात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व निधी अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उपोषणकर्ते अंकुश हाणमंत जेठे यांनी पंचायत समिती विभाग व जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे दि. 2 फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रार अर्जानुसार दि. 21 नोव्हेंबर 2025 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत दलित वस्ती विकास, घरकूल योजना, आमदार निधी, DPDC जिल्हा नियोजन निधी, तसेच ग्रामपंचायत खात्याच्या ऑडिटमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य खर्च झाल्याचा संशय आहे. यासोबतच तलाठी सात-बारा फेरफारातील मागील पाच वर्षांच्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अर्जात नमूद केल्यानुसार, संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या संगनमताने विकासकामे केवळ कागदावर दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात सी.सी. रस्ते, घरकूल योजनेची कामे जमिनीवर दिसून येत नाहीत. त्यामुळे शासनाचा निधी नेमका कुठे गेला, असा थेट सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत दि. 2 फेब्रुवारीपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा अन्नत्याग करण्याचा निर्धार अर्जात नमूद करण्यात आला आहे. या तक्रारीमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1 News & Daily Newspaper is Hiring Reporters V1 News & Daily Newspaper invites applications from enthusiastic and dedicated individuals to join our team as Reporters. Interested candidates can contact: PENDKAR SRINIVAS 📞 9603925163 📞 9834485832

Leave a Comment

Read more
Read more