May 15, 2026 7:33 pm

V1News Telangana

महिला दिनी लघुळच्या पोलीस पाटलांचा स्तुत्य उपक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांचे महिलांना सुरक्षिते विषयी केले मार्गदर्शन नांदेड प्रतिनिधी :- वैभव घाटे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे 

जागतिक महिला दिनानिमित्त लघुळ येथे महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम लघूळ येथील पोलीस पाटील सौ.नागमणी देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या आरोग्य व स्वच्छते बाबतही जनजागृती करण्यात आली. महिलांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व समजावून सांगत सर्व उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात अंगणवाडी सेविका जयश्री मुपडे,मठवाले ताई,अरुणा पांचाळ, तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुमित्रा सिधुलवार उपस्थित होत्या. आशा सेविका भारतबाई सोनकांबळे व कलावतीबाई ठाकूर यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लघुळचे शिक्षक डी. जी. तवटे सर यांच्या उपस्थितीत जुने व नवीन गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामस्थ व महिला कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more

1. గుట్కాపై చీత ఫోర్స్ దాడులు 2. మహారాణా ప్రతాప్ జయంతి ఘనంగా 3. ఉపాధి కోసం వెళ్ళిన వారిపై అప్రమత్తత 4. ఈత చెట్లు విధ్వంసంపై గీత కార్మికుల ఆవేదన 5. రైతు సమస్యల పరిష్కారానికి ఎమ్మెల్యే హామీ 6. “మన ఊరు – మన భద్రత” అవగాహన కార్యక్రమం

Read more