May 15, 2026 7:33 pm

V1News Telangana

बिलोली खरेदी-विक्री संघ निवडणुकीत खतगावकर गटाचे यश; भाजपच्या ठक्करवाड गटाला मोठा धक्का!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड – वैभव घाटे 

बिलोली तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ संस्था मतदार संघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गटाने आपले वर्चस्व सिद्ध करत शानदार विजय संपादन केला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या नेतृत्वाखालील गटाला या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत श्री संगमेश्वर शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार पाटील बालासाहेब रामराव व मंगनाळे रमेश मोगलप्पा हे विजयी झाले आहे. बिलोली शहरातील नवीन स्थानक येथे फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोष साजरा केला यावेळी

माजी नगराध्यक्ष यादराव तुडमे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी पाटील खतगावकर, राष्ट्रवादी चे श्रिनिवास पाटील नरवाडे,उप सभापती आनंद बिराजदार, अभिजित तुडमे ,गोविंदराव बादेवार, इंद्रजित तुडमे, सय्यद रियाज,शंकरराव हांडे ,श्रीराम पाटील , संतोष पुय्यड,गंगाधर नरवाडे,हणमंतराव बिराजदार ,मारुतीराव पाटील, मिलिंद मांजरमकर, दिलीप उत्तरवाड,मारोती पाटील दगडे, राजु गादगे,मारोती नाईक,बाजीराव पाटील , गणेश मेडेकर, सोमदास गजलवाड, दिपक शिंदे, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more

1. గుట్కాపై చీత ఫోర్స్ దాడులు 2. మహారాణా ప్రతాప్ జయంతి ఘనంగా 3. ఉపాధి కోసం వెళ్ళిన వారిపై అప్రమత్తత 4. ఈత చెట్లు విధ్వంసంపై గీత కార్మికుల ఆవేదన 5. రైతు సమస్యల పరిష్కారానికి ఎమ్మెల్యే హామీ 6. “మన ఊరు – మన భద్రత” అవగాహన కార్యక్రమం

Read more