May 31, 2026 3:54 am

V1News Telangana

31 मे हा जागतिक तंबाखू विरोध दिवस विशेष लेख

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्र तर्फे तंबाखू वापरामुळे वेगाने पसरणाऱ्या साथीकडे आणि त्यापासून उद्भवणाऱ्या धोक्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी इसवी सन 1988 पासून 31 मे हा जागतिक तंबाखू विरोध दिवस पाळण्याचे ठरविण्यात आले प्रत्येक नागरिकाला आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा हक्क आहे तंबाखू मुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो तंबाखूच्या सेवनाचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे बिडी, सिगारेट, जर्दा, गुटखा ,तपकीर ,हुक्का ,
हुक्का पाईप, तंबाखूची पेस्ट, सुद्धा तयार व्हायला लागलेली आहे कोणत्याही पद्धतीने तंबाखू आपल्या शरीरात गेल्या तरी त्यामुळे होणारे सर्व शारीरिक व मानसिक परिणाम हे त्यातील निकोटीन मुळेच होत असतात निकोटीन मुळे सुरुवातीला ताजेपणा वाटते परंतु नंतर हळूहळू शरीराच्या जवळजवळ सर्वत्र इंद्रियाचे काम थंडावते तंबाखूचे परिणाम तात्काळ जाणवत नाही हळूहळू शरीर पोखरणी होत असते अशी ही विषवल्ली आहे. म्हणूनच अशा व्यसनी माणूस घातक आजाराचा हळूहळू बळी ठरतो तंबाखूमुळे शरीराच्या कोणत्याही भागाचा कर्करोग होऊ शकतो त्यातही तोंडाचा कर्करोग चे प्रमाण जास्त असते तंबाखूच्या सेवनाने पाचक रसाचे प्रमाण घटते, दृष्टी मंदावते, मज्जा पेशी व रंगसूत्रावर परिणाम होतो आम्लपित्त वाढते स्नायू वरील ऐच्छिक आणि अनैच्छिक नियंत्रण जाते मधुमेहाचा धोका वाढतो डोळे नाकान घसा याचा दाहा होतो मूत्र वहन संस्थेवर दुष्परिणाम होतो उच्च रक्तदाब व हृदयविका होऊन कार्यक्षमता घडते तसेच अन्ननलिका ,स्तन ,स्वादुपिंड ,घसा , स्वादुपिंड , जीभ गर्भाशय, मूत्राशय , जीभ , मूत्राशय ,आतडे, मूत्रपिंडे ,यांच्या कर्करोगाची शक्यता वाढते आकडेवारीनुसार जगात दरवर्षी 50 लाखापेक्षा जास्त लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू पावतात एच आय व्ही, कर्करोग हृदयरोग यांनी मरण पावणाऱ्याची लोकांपेक्षा तंबाखूच्या व्यसनाने मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे तंबाखू मध्ये अनेक विष द्रव्य ठासून भरलेली आहेत पुन्हा आकडेवारी सांगायचे असल्यास तंबाखू मध्ये जवळजवळ 4 तंबाखू मध्ये जवळजवळ 4000 अपायकारक रासायनिक द्रव्य जेव्हा आपण सिगरेट किंवा बिडी ओढत असतो त्याच्या धुरातून कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी द्रव्य आपल्या फुफुसात प्रवेश करते त्याचबरोबर धूर बाहेर सोडल्यावर इतर लोकांवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होत असतो तंबाखूचा वापर कमी व्हावा म्हणून डॉक्टर, मनोविकार तज्ञ ,दंतवैद्य ,अनेक सेवाभावी संस्था या तंबाखू विरोधी मोहिमेत मोलाची कामगिरी बजावू शकतात जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मेला एखादे विशिष्ट घोषवाक्य देऊन या समस्ये कडे लक्ष वेधत असते व्यसनाधीन लोकांना अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्ग तत्वे दिलेली आहेत व तसेच केंद्र सरकारने सण व तसेच केंद्र सरकारने सन 2018 मध्ये संपूर्ण गुटखाबंदी निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात आठ वर्षांपूर्वीच अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली होती मात्र सेवनावर बंदी नसल्यामुळे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आहे असे दिसून येते त्याचबरोबर कलम तीन नुसार सार्वजनिक आरोग्य च्या हितासाठी गुटखा पान मसाला गुटखा पान मसाला उत्पादन विक्रीवर बंदी घाल बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच तंबाखूमुक्त जगाचे ,तंबाखूमुक्त महाराष्ट्राचे ,तंबाखूमुक्त भारताचे, स्वप्नन वास्तवात येण्यासाठी सर्वसामान्य नागरिक सेवाभावी संस्था मुख्य प्रजापिता ब्रह्माकुमारी चे मेडिकल विंग यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे म्हणून आपण 31 मे रोजी या तंबाखू विरोधी दिन पासून हे अभियान सुरू करण्यास आपण सर्वजण वचनबद्ध होऊया

ब्रह्माकुमारी योगेंद्र भाई ( महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार महाराष्ट्र शासन

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more
Read more