May 28, 2026 11:31 pm

V1News Telangana

बिलोली तालूक्यातील १९ पेट्रोल पंपाची महसूल प्रशासासनातर्फे तपासणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे 

बिलोली तालुक्यात इंधन पुरवठा सुरळीत राहावा तसेच कोणतीही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी महसूल प्रशासनातर्फे तालुक्यातील १९ पेट्रोल पंपांची विशेष तपासणी करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, नायब तहसीलदार वंदना गवळी तसेच लिपिक शुभांगी मनधरणे यांच्या पथकाने दि. २३ रोजी विविध पेट्रोल पंपांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पेट्रोल व डिझेलचा स्टॉक तपासण्यात आला तसेच नोंदींची पडताळणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान संबंधित पेट्रोल पंप चालकांना दैनंदिन अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिक, शेतकरी, आवश्यक सेवा व शासकीय यंत्रणांना आवश्यकतेनुसार इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय बाटल्या, कॅन किंवा ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करू नये, अशा कडक सूचना देण्यात आल्या. पेट्रोल पंप परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले.

बिलोली तालुक्यात पेट्रोल व डिझेलची कोणतीही कमतरता भासणार नसून, वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक त्या सुविधा व समन्वयासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनासाठी अनावश्यक गर्दी किंवा रांगा लावू नयेत, असे आवाहन करण्यात आले. पेट्रोल पंप परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी चालकांनी दक्षता घ्यावी, असेही बिलोली महसूल प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

Leave a Comment

Read more