V1News Telangana

best news portal development company in india

*छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथील माजी विद्यार्थी यांचा स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न*

SHARE:

*दहावी बॅच 1998 व बारावी 2000 बॅच यांचे गेट-टुगेदर तब्बल 28 वर्षानंतर माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र*

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

संस्कृती संवर्धन मंडळ शारदानगर सगरोळी श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला तब्बल 28 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे , संस्कृती संवर्धन मंडळाचे सचिव डॉ. जयंत जकाते हे होते. या स्नेहमिलन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड , व माजी मुख्याध्यापक खंडेराव शिंदे , व प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक , मठदेवरु . राजश्री, श्री शाहू सैनिकी विद्यालयाचे प्राचार्या , गिरीश आलुरकर . प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक , भगवान गिरगावकर , कोटनोट , भंडारे , बिडकर , पेटकर , पोलावार , वाघमारे सुरकुटलावार. भुले आकाश शिंदे.तसेच सौ पोलावार मॅडम, , सौ मठवाले मॅडम, यांचा सन्मान करण्यात आला डॉ जकाते यांनी मनोगत व्यक्त करत त्यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील जीवन व आरोग्य या बाबत सर्वांनी कशी काळजी घ्यावी त्याचे मार्गदर्शन सर्वांना केले, व तसेच मु अ संभाजी गायकवाड यांनी, जुन्या आठवणी उजाळा देत सर्वचे भरभरून कौतुक केले व. श्री सैनिकी विद्यालय यांचे प्राचार्य, गिरीश आलूरकर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, संस्कृती संवर्धन मंडळाचे सचिव श्री डॉ. जयंत जकाते हे होते. व तसेच मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी, श्रीहरी देशमुख यांनीआपल्या मनोगत मध्ये खूप चांगले प्रकारे शिक्षक व विद्यार्थी यांच्या विश्वासाबद्दल व लहानपणापासून शिक्षकांनी आमच्यावर कसे संस्कार दिले व त्याचा उपयोग भविष्यामध्ये विध्यार्थ्यांना कसा झाले याचे उत्तम उदाहरण देऊन आपले मनोगत व्यक्त केले, माझी विद्यार्थी, सुरेश सोनकांबळे यांनी आपल्या मनोगत मध्ये प्रत्येक शिक्षकां बद्दलच्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनामध्ये आणखी बरेचसे काही गोष्टी शिकण्यासारखे राहून गेल्याची इच्छा तथा दिलगिरी व्यक्त केली. अजून ती शकण्याची इच्छा कायम आहे असे सांगत आपले मनोगत व्यक्त करताना सगळ्यांना हसू अनावर झाले होते, उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सर्व शिक्षकांचे व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तेच माझी विद्यार्थी विकास मोरे यांनी सुद्दा आपलें मनोगत व्यक्त करत, आलेल्या सर्व गुरुजन वर्ग व माझी विद्यार्थी व आयोजन व्यवस्थापकाचे कौतुक व अभिनंदन केले


तसेच डॉक्टर शंकर गायकवाड़ माझी विद्यार्थी, यांनी सुद्दा आपले मनोगत वक्त केले. व ते सगरोळीतील शाळेत बालपणी शिक्षण घेत आसताना, तेथील गुरुजन वर्ग त्यांना आपल्या आई-वडिलाप्रमाणे कसे सांभाळले हे देखीले त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केले. हे व्यक्त करत आसताना त्यांचें अश्रु अनावर झाले.त्यानंतर शिवकुमार काशेट्टे माझी विद्यार्थी यांनी देखील आपले मनोगत खूप सुंदर मांडले तसेच मित्रांवरती सुंदर कविता सादर केले व सर्वांचे अभिनंदन करत सर्व आयोजनकर्त्यांचे आभार मानले, व माजी विद्यार्थी आनंदा हिप्परगेकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आहे, जवळपास दोन तास चाललेल्या गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सगरोळीचे गुंडपवार नागनाथ राम अपराजे मठवाले नागनाथ रामसिंह ठाकूर , दिलीप सोमपुरे , प्रदीप जाधव , गोंडा महादू , जयवंत इबितवार, कामाजी इबितवार ,
श्रिनिवास सुरकुटलावार,सौ मेघाली खिरप्पवार सौ अर्चना देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा स्नेह मिलन सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी भविष्यातही अशा प्रकारचे स्नेह मिलन उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला माजी विद्यार्थिनी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील कार्यरत असलेले सहशिक्षिका सौ मेघाली खिरप्पवार यांनी बहारदार सूत्रसंचालन केले

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1news న్యూస్.&దినపత్రికకు విలేకరులు కావలెను.పెండేకర్.శ్రీనివాస్. సెల్,,9603925163..9834485832.....

best news portal development company in india