[IT_EPOLL id=”1″][/IT_EPOLL]]नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील मौ. बोळेगाव येथील संबंधित ग्रामसेवकाकडून गटविकास अधिकारी श्रीनिवास पद्दमवार यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली. बोळेगावच्या अकार्यक्षम व भ्रष्टाचारी ग्रामरोजगार सेवकास निलंबीत करण्यात आलेला ग्रामसभेच्या ठरावाचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती कार्यालय येथे न दाखल करता गुलदस्त्यात ठेवला आहे.यामुळे ग्रामसेवक मुरलीधर बैलके यांच्या कार्यप्रणालीवर गावकऱ्याकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
येथील वादग्रस्त ग्रामरोजगार सेवक विठ्ठल एकंबे हे गेल्या कांही वर्षांपासून घरकुल लाभार्थ्यांसह रोहयोच्या विविध योजनेत गैरव्यवहार करून शासनाचे लाखो रुपये परस्पर हडप केले असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या असून. यात संबंधित ग्रामसेवक मुरलीधर बैलके( दरेगावकर) यांचेही या गैरव्यावहारात हात गुंतले असल्याने संबंधित रोजगार सेवका विरुद्ध येणाऱ्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यास पाठीशी घातले जात आहे.परंतु गावकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे नाईलाजास्तव . दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामरोजगार सेवसकाला पदावरून निलंबीत करण्या विषयी ग्रामसभा घेण्यात आली. त्या दरम्यान रोजगार सेवकाच्या विरुद्ध शेकडो गावकऱ्यांच्या सह्यानिशी एक मताने ठराव पारित करण्यात आला .पण आता आपल्याही भ्रष्टाचाराचे बिंग फुटणार म्हणून संबंधित ग्रामसेवकाने ग्रामसभेत पारित करण्यात आलेला त्या ठरवाचा अहवाल पंचायत समिती कार्यालयाकडे न पाठविता गुलदस्त्यात ठेवला आहे.
परंतु वरिष्टाकडे गावकऱ्यांच्या पुन्हा तक्रारी वाढल्यामुळे गटविकास अधिकारी श्रीनिवास पद्दमवार यांनी त्या ठरवाचा अहवाल कार्यालयात तात्काळ सादर करण्यासाठी दि.९ सप्टेंबर रोजी संबंधित ग्रामसेवक यांना लेखी आदेश बजावला आहे. तरीही तो अहवाल वरिष्टकडे सादर न करता वरिष्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. म्हणून या ग्रामसेवकच्या कार्यप्रणालीवर गावकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.–
Author: Vaibhav Ghate
Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734







