Breaking News

V1News Telangana

best news portal development company in india

नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई कोटलावार यांचा विविध विकास कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा

SHARE:

 

नांदेड प्रतिनिधी- वैभव घाटे

कुंडलवाडी येथील शहर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व बालकल्याण सुविधांबाबत निर्माण झालेल्या समस्या व गरजा लक्षात घेता नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्या नेतृत्वाखाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा व निवेदने सादर करण्यात आले
. कुंडलवाडी येथील नवीन ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, तसेच सध्या मंजूर असलेले ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय हे लोकसंख्येच्या दृष्टीने अपुरे ठरणार असल्याने ते ५० खाटांचे करण्यात यावे,
याशिवाय कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासत असून, तातडीने एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख (नांदेड) यांच्याकडे करण्यात आली. यावर तत्काळ वैद्यकीय अधिकारी देण्याबाबत अनुकूल प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके (नांदेड) यांच्याशी देखील ग्रामीण रुग्णालयाबाबत चर्चा करण्यात आली असून, या प्रकरणाचा पाठपुरावा तातडीने करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवांबरोबरच कुंडलवाडी शहरातील बालकांच्या पोषण व विकासासाठी नवीन १० अंगणवाड्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, नांदेड यांच्याकडे करण्यात आली असून, यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या सर्व चर्चांमध्ये नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार, गजाननजी कोटलावार,नगरसेवक प्रतिनिधी संजय खुळगे उपस्थित होते. कुंडलवाडीकरांच्या मूलभूत आरोग्य व बालकल्याण सुविधांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई कोटलावार यांनी यावेळी सांगितले.

Vaibhav Ghate
Author: Vaibhav Ghate

Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734

best news portal development company in india
best news portal development company in india
best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई