Breaking News

V1News Telangana

best news portal development company in india

मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची स्थापना करा – नगरसेविका सौ अनुपमा गायकवाड

SHARE:

मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची स्थापना करा – नगरसेविका सौ अनुपमा गायकवाड

नांदेड प्रतिनिधी – वैभव घाटे

शहरातील विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षितेसाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात यावी तसेच दोन आठवडी बाजार व सार्वजनिक ठिकाणे, शहरातील अनेक भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड व नगरसेविका सौ. गोदावरी गंगाधर पुपलवार यांनी एका निवेदनाद्वारे बिलोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांच्याकडे केली आहे.

बिलोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांची, विध्यार्थ्यांची, शिक्षणासाठी मुलींची ये-जा असते तसेच शहरात दोन आठवडी बाजार भरतात या आठवडी बाजारात महिलांची संख्या जास्त असते.या दोन्ही बाजारात पोलिसांची गस्त वाढवावी व दोन दिवस पोलीस कर्मचारी नियुक्त करावा जेणे करुन मोबाईल चोरी, दुचाकी चोरी व महिलांची छेड काढणाऱ्यावर वचक बसेल.असे निवेदनात म्हण्टले आहे. शहरातील अनेक भागात चोरीचे प्रमाण वाढले असून चोरांना पोलिसांची भीती राहिली नाही. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.शहरात व परिसरात शाळा महाविद्यालय असल्याने शिक्षणासाठी मुली शहरातुन व ग्रामीण भागातून प्रमाणात येतात. तसेच सकाळी, संध्याकाळी महिला वॉकिंगसाठी घरातून निघतात त्यामुळे मुली व महिलांच्या सुरक्षित्तेसाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात यावी. शहरातील बसस्थानक, सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालय सारख्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी त्यामुळे विदयार्थीनी, महिला सुरक्षित राहतील व चोरीवर आळा बसेल, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.असे सौ. गायकवाड व सौ पुपलवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. पोलीस अधिकाऱ्यानी तात्काळ दामिनी पथकाची स्थापना करून पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड, नगरसेविका सौ. गोदावरी गंगाधर पुपलवार यांनी केली आहे.
—————————————-
टवाळखोरांची गय केली जाणार नाही- कमल शिंदे, सहाय्यक पो.नि.

मुली व महिलांची छेड काढणाऱ्यांची, टवाळखोरांची गय केली जाणार नाही. जागरूक नागरिकांनी व लोकप्रतिनिधीनी आपल्या भागातील विद्यार्थिनीना, महिलांना, कसल्याही प्रकारचा त्रास जर कोणी देत असेल तर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन किंवा मोबाईलद्वारे कळवावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी केले आहे.
—————————————-

V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1news న్యూస్.&దినపత్రికకు విలేకరులు కావలెను.పెండేకర్.శ్రీనివాస్. సెల్,,9603925163..9834485832.....

best news portal development company in india
best news portal development company in india
best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई