V1News Telangana

best news portal development company in india

जुगारावर लगाम कधी? नांदेड जिल्ह्यात अवैध पत्त्यांचा खेळ जोरात कोंडलवाडी–अज्जापुर परिसरात लाखोंचा जुगार…

SHARE:

तेलंगणातून आलेले जुगाराचे राऊडी सक्रिय
स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय.

 


नांदेड :
नांदेड जिल्ह्यातील कोंडलवाडी. अज्जापुर गावासह परिसरातील सीमावर्ती व जंगल भागात अवैध जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागांनी अद्याप ठोस कारवाई न केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावाच्या सीमावर्ती भागांना व निर्जन जंगल परिसराला अड्डा बनवून काही जुगार आयोजक अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पत्त्यांचा जुगार चालवत आहेत. तेलंगणा राज्यातून आलेले जुगाराचे राऊडी येथे तळ ठोकून लाखो रुपयांचे डाव व पंद्ये खेळवत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या अवैध जुगारामुळे परिसरातील युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. असे असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अवैध जुगाराबाबत यापूर्वी अनेक वेळा माहिती देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने काही स्थानिक अधिकारी जुगार आयोजकांच्या प्रभावाखाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. ही चर्चा असली तरी सातत्याने मिळणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष होणे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

अडथळ्याविना सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
V1News Telangana.& Hindi & Mharti.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.

V1news న్యూస్.&దినపత్రికకు విలేకరులు కావలెను.పెండేకర్.శ్రీనివాస్. సెల్,,9603925163..9834485832.....

best news portal development company in india