बिलोली:
आज वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त, पहाटेच्या थंडीची पर्वा न करता, चहाच्या घोटासोबत ताजी माहिती घराघरात पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या विशेष दिवशी बिलोली येथील वृत्तपत्र वितरक श्री सायलु नरोड आणि श्री नागेश कोंडावार यांचा त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभावेळी ‘लोकमत’चे श्री विजय होपळे, पत्रकार श्री संदीपराजे गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री मुकींदर कुडके, व्यापारी श्री त्रिंबक पाटील सावळीकर, श्री अनिल बंडे, श्री गंगाराम पाटील चिंचोले आणि श्री विष्णू अण्णा यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपस्थितांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाचे कौतुक केले. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत वाचकांपर्यंत अचूकपणे वृत्तपत्र पोहोचवण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. श्री नरोड आणि श्री कोंडावार यांनी या सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.
Author: V1News Telangana.& Hindi & Mharti.
V1news న్యూస్.&దినపత్రికకు విలేకరులు కావలెను.పెండేకర్.శ్రీనివాస్. సెల్,,9603925163..9834485832.....








